Sunday 16 May 2021

Ha Khel Savlyancha Movie Review

 

 

SPOILERS AHET OK!

काशिनाथ घाणेकर ह्यांचा सस्पेन्स सिनेमा म्हणलं कि बऱ्याच लोकांना आधी 'पाठलाग' आठवतो, जो एक अप्रतिम चित्रपट आहेच, पण आज त्यांच्या दुसऱ्या एका सस्पेन्स मूवी बद्दल बोलणार आहे मी. तो चित्रपट म्हणजे 'हा खेळ सावल्यांचा'.

लहानपणी टी.वी.  वर जेव्हा हा पिच्चर लागला होता तेव्हा हिम्मत झाली नव्हती. पण इतक्या वर्षांनी पाहिल्या वर सुद्धा  हा चित्रपट ओउटस्टँडिंग आहे. आणि मी ह्या मूवी ला आताच्या  मूवीझ बरोबर पण compare केलय ok. तर अस काय ageless आहे ह्या मूवी मध्ये ते बघू.

गदिमा नि  लिहलेला आणि वसंत जोगळेकरांनी डायरेक्ट केलेला हा पिच्चर, तर गोष्ट छान असणार ह्या बद्दल तर शंकाच नाही. पण हॉरर सिनेमा नुसत्या स्टोरी वर चालत नाही. गोष्ट वाचणे वेगळ, तो अनुभव आहे, पण कॅमेरा समोर तेच साकारणं vegla. चांगले plot असून farce बनून राहिलेले अनेक मूवीज आहेत जगात.

म्हणून काही हॉरर एलेमेंट्स तर आलेच. ह्या बाबतीत थोडा ट्रॅडिशनल अप्रोच झाला असेल ह्या मूवीचा  पण तरीहि  आपण ओउटस्टँडिंग बद्दल बोलत होतो, ते कस हे बघू.

आधी ते ट्रॅडिशनल एलेमेंट्स काय आहेत.

1) एखादी जुनी किंवा ऐतिहासिक हवेली किंवा वाडा.

2) टिपिकल विलंन म्हणजे सावत्र आई किंवा मुनीमजी.

3) सुंदर, हुशार पण इनसेंट  हेरॉईन.

आणि 4) एखाद्या चांगल्या भूता शिवाय हॉररची मजा काय.

हे ट्रॅडिशनल एलेमेंट्स ह्या करता कि ह्या शिवाय हॉरर स्टोरी लिहिणे कठीण आहे, अशक्य नाही पण कठीण. तर हे तर  आलंच, पण ह्या गोष्टींचे ट्रीटमेंट हे वेगळ करायला हव, नाही तर हेच एलेमेंट्स घेऊन आजकाळचे  हॉरर सिरीझ  नुसते  white lens घातलेली चेटकीण घेऊन, हेरॉईनची  आरडा-ओरडा करतात . तसं  नाहीये इथे.

त्या नंतर इंडियन सिनेमाचा माझा pet peeve म्हणावं  तर गाणी. मला चांगली गाणी आवडतात, मग भाषा कुठलीहि  असो. पण जेव्हा तीच गाणी मूवीजच्या मध्ये घालतात तेव्हा ते स्टोरीला  interrupt करतात असा मला वाटतं. फार कमीच अशे डायरेक्टर्स आहेत ज्यांची गाणी हि dialogue च काम करून जातात.

हा खेळ सावल्यांचा मधली गाणी तशी आहेत. ते त्यांची ची नुसती मनस्थिती सांगत नाहीत पण एक ऍटमॉस्फेर पण क्रीट करतात. इंदुमतीच्या आयुष्यातला एकटे पण, तिची guilt, हे सगळे mood हि  गाणी कॅप्चर  करतात. बॅकग्राऊंड  स्कोर चा pace कधीही  कट न करता हि गाणी  मूवी मध्ये blend होतात.

पण हेही पन्नास टक्केच  काम झालं. कारण ह्या  सगळ्या गोष्टी मध्ये जर  अक्टर्स त्याच्या कसोटी  ला उतरले नाही तर मग  सगळं फसलं असतं. म्हणूनंच ह्या मूवीचे  कास्टिंग  एक्सट्राऑर्डिनरी आहे.

ह्या मूवीच्या वेळेला काशिनाथ घाणेकरांच्या सिनेमा जवळ जवळ सोडूनच दिला होता, ते नाटकताच जास्त काम करू लागले होते, पण ह्या मूवीला त्यांच्या कॅलिबरचाच  माणूस हवा होता. मूवी मध्ये असलेल्या डॉक्टरच मिश्किल स्वभाव कसा गंभीर होतो, त्याची जी body language आहे, ती काशिनाथ घाणेकर आणि ह्या मूवी साठी करी केली आहे, पाठलाग एक सस्पेन्स मूवी आहे पण त्याच्या मध्ये त्यांची body language पूर्ण वेगळी आहे.

इंदुमती म्हणजे अशा काळे तर ह्या मूवीच्या protagonist आहेत, सगळं cinema त्यांच्या भवतीच आहे. अश्या  challenge ला त्या  खऱ्या उतरल्या. इंदुमती चा एक खेळकर स्वभाव आहे, पण त्या  खाली इतके लेयर्स आहेत, guilt चे, अविश्वासाचे, ते प्रत्येक  scene मध्ये इतके independently त्यांनी  साकारले आहेत.

आणि ज्या  outstanding गोष्टी बद्दल आपण आधी बोललो होतो ती इथे आहे. लालन सारंग हि इंदूची  सावत्र आई. तिला चिडकी-मारकुटी   दाखवला असतं तर   काहीच फरक पडला  नस्ता. शेवटी राहायला जागा आणि दोन  वेळचं  जेवण ह्या पलीकडे तिचे काहीच अधिकार  नाहीत. पण अश्या हि character ला  वेगवेगळ्या छटा देऊन  गदिमा नि  आपला  greatness दाखवला  आहे. इंदूला मोठा करताना ती तिला आईचिच माया देते. Property मध्ये वाटा  हवा हि तिची greed नाहीये पण कुठेतरी आपण नंतर एकट्याच  राहून जाऊ हि भीती आहे.

राजा गोसावींचा character कुठेतरी  फक्त comic relief राहून जाईल असं मला  वाटलं होता पण तसं  झाला नाही. ते कसं हे तुम्हीच मूवी मध्ये बघावं. पण त्या character बद्दल जे मला special वाटलं  ते हे ki त्यांनी एका failed actor ची भूमिका करण्या मध्ये अनेक  जुन्या संगीत नाटकांचा  आणि characters चा  उल्लेख केला आहे, त्यातली गाणी म्हणली आहे. फार कमीच लोक जाऊन स्वतः अश्या गोष्टी research करतील तर अश्या सहज पne त्या जुन्या कलेला सम्मान  द्यायचा , त्याची आठवण  करायची हे एक छान  tool आहे.

खरंच standing the test of time ज्याला  म्हणतात तशी हि  movie आहे.

ह्या movie चा हा review तुम्हाला कसा वाटलं मला, माझ्या YouTube channel वर सांगा. Link in the description. 

This movie called Ha Khel Savlyancha, which roughly translated means 'a play of shadows' is a psychological drama. The story written by GaDiMa and directed by is a movie ahead of its time. Before we talk about the characters, let us see why the story is so extraordinary.

Despite seemingly traditional tropes of horror in place, this movie achieves to go beyond it. What do I mean by that? Well, let's count some of the traditional horror elements this movie checks out: 

1) A traditional palatial house, check.

2) A standard villain in the form of either a step mother or a munimji, check and check.

3) A vulnerable, kind heroine, check

4) And of course, you wouldn't do horror without a ghost, so check!

So it takes all these standard elements but achieves to become something extraordinary. 

For instance, I love Indian songs, I have always felt like they interrupt the narration. But the songs in the movie blend into the story, in the environment, they do not break the pace of the movie but instead carry it forward.



Vaalvi Marathi Movie Review 2023

SPOILERS: Do not miss this dark comedy, go watch it on Zee5 first. Even in a country of billion plus people, if you go missing, people notic...