*वाठार स्टेशन चे नामकरण*
सातारा जिल्ह्यात, कोरेगाव तालुक्यात, पुणे मिरज रेल्वे लाईनवर *वाठार स्टेशन* नावाचे स्टेशन आहे. आश्चर्य म्हणजे त्याच्या आजूबाजूस कोठेही वाठार नावाचे गाव नाही. स्टेशनच्या भोवती आता खूप वस्ती वाढली आहे आणि त्या वस्तीचे गावात रुपांतर झाले आहे. त्या गावाचे नाव *वाठार स्टेशन* असेच आहे.
याचा इतिहास फार रंजक आहे. इंग्रजांनी जेव्हा *पुणे – मिरज रेल्वे* सुरू केली तेंव्हा कोळशाचे इंजिन होते.त्या मध्ये ठराविक वेळेनंतर पाणी भरावे लागायचे. पुणे स्टेशन सोडल्यानंतर आताच्या वाठार स्टेशन पर्यंत आल्यावर पाणी भरणे आवश्क व्हायचे पण तिथे वस्ती किंवा पाण्याची काही सोय नसल्यामुळे इंग्रजांनी तिथे खास *water Station* बांधले. त्याचे स्थानिकांनी *वाठार स्टेशन असे नामकरण* केले. स्टेशनमुळे शेजारी वस्ती वाढली आणि गाव अस्तित्वात आले.
त्याच्याच पुढे घाटात *आदर्की* नावाचे स्टेशन आहे. तिथे पण आदर्की नावाचे गाव अस्तित्वात आले. प्रत्यक्षात घाटातील चढामुळे इंजीन थांबवून *दुसरी किल्ली* वापरून पुढे इंजीन चालवाय लागायचे म्हणून इंग्रजांनी तिथे स्टेशन बांधले व त्याचे नाव *other key* असे ठेवले होते.
Water Station_ वाठार स्टेशन
Other Key_ आदर्की
सौजन्य- श्रीहरी इनामदार
No comments:
Post a Comment